Nashik Police Academy | राज्यभरातून अनेक प्रशिक्षणार्थी पोलिस हे नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत (Nashik Police Academy) प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. याच नाशिक पोलिस अकॅडमीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकॅडमीच्या रहिवासी वसाहतीत एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार व मारहाण झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime)
Nashik Police Academy | नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, संशयित आरोपी व पीडित महिला पोलिस कर्मचारी यांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, संशयित आरोपीने पीडितेकडून शरीरसुखाची मागणी केली. महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता संबंधित संशयित आरोपीने महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. एवढंच नाहीतर तिला रात्रभर मारहाणही केली आणि या संपूर्ण घटनेचे त्याने आपल्या मोबाइल मध्ये व्हिडिओ शूटिंगही केले. (Nashik Crime)
Nashik Hit and Run | चांदवड ‘हीट अँड रन’ प्रकरणी मुख्य संशयित स्वतःहून न्यायालयात
पीडित महिला ही पोलिस कर्मचारी असून, संशयित आरोपी हा अकादमीत स्वच्छेतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर महिलेने तातडीने गंगापूर पोलिस ठाण्यात (Nashik Police) फिर्याद दिली असता संशयित आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी सुमित नामक एका संशयिताला अटक केली असून, पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nashik Citilink Accident | नाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम