Nashik Hit and Run | चांदवड ‘हीट अँड रन’ प्रकरणी मुख्य संशयित स्वतःहून न्यायालयात

0
68
Nashik Hit and Run
Nashik Hit and Run

नाशिक :  वरळी हीट अँड रन प्रकरण राज्यभर गाजत असतानाच नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हीट अँड रनची घटना घडली होती. नाशिक जिल्ह्यात चांदवड-मनमाड रोडवरील हरणुल टोलनाक्याजवळ ही घटना घडली होती. तर, यात एक कर्मचारी जागीच ठार झाला असून, दोन पोलीस जखमी होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित हा स्वतःच चांदवड न्यायालयात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. ता, या प्रकरणात आतापर्यंत मुख्य संशयित व अन्य एकास नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik news)

Nashik Hit and Run | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, सिल्व्हासा येथून नवसारी येथे नाशिकहून अवैधरित्या मद्यसाठा घेवून जाणाऱ्या क्रेटा कारचा राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकचे पथक व लासलगाव पोलीस पाठलाग करत होते. यावेळी चांदवड-मनमाड रोडवर पोलिसांच्या वाहनाने या संशयित क्रेटा कारला अडवण्याचा प्रयत्न केला असता वाहनाने धडक दिल्याने पथकाची स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटली. या अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी तीन कर्मचारी जखमी झाले. (Nashik Hit and Run)

Nashik News | चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अपघात; एकाच मृत्यू, ३ गंभीर जखमी

पोलिसांनी तपासाचा वेग वाढवल्यानंतर संशयित स्वतः न्यायालयात 

दरम्यान, आता या प्रकरणातील मुख्य संशयित देविदास कांतीलाल पटेल हा स्वतःहून चांदवड न्यायालयात हजर झाला असून, या प्रकरणी मुख्य संशयितासह अन्य एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत वाहनाचा आणि संशयितांचा शोध सुरू केल्यानंतर हा संशयित स्वतःहून समोर आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून दखल 

दरम्यान, या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दखल घेत, कठोर कारवाईचे आदेश दिले होते. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या दोन पथकांना विदेशी बनावटीच्या दारूची एका वाहनातून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. (Nashik Hit and Run)

त्यानंतर पथकाकडून या वाहनाचा पाठलाग सुरू असताना टीमवर हल्ला करण्यात आला आणि यामध्ये एक कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आणि दोन कर्मचारी हे जखमी झाले आहेत. तर, या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आम्ही विभागामार्फत मदत करू. पण आमची सुरू असलेली मोहीम ही अशीच सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍याचा जीव घेणं हे योग्य नसून या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही शंभुराज देसाई यांनी सांगितले.

Nashik Citilink Accident | नाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here