शहरात चार दिवस रेड अलर्ट, महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जाहीर

0
44

नाशिक – हवामान खात्याने ११ ते १४ जुलै दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी नाशिककरांना सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, की शहरात आतापर्यंत ५१ मिमी पाऊस तर गंगापूर धरणक्षेत्रात ७६ मिमी इतका पाऊस झाला आहे. गंगापूर धरण ६० टक्के भरल्यामुळे आतापर्यंत १०,००० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या आसपास असलेल्या नागरिक आणि दुकानदारांनी लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले.

तसेच, बी. डी. भालेकर हायस्कूल, गणेशवाडी येथील महापालिका शाळा येथे महापालिकेने बेघरांसाठी राहण्याची सोय केली आहे. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यस्थापन विभागाच्यावतीने खालील हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे सांगितले.

नाशिक महानगरपालिका हेल्पलाईन नंबर :

मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष : ०२५३ – २५७१८७२/२३१७५०५
पंचवटी विभागीय कार्यालय : ०२५३ – २५१३४९०
सातपूर विभागीय कार्यालय : ०२५३ – २३५०३६७
नाशिक पूर्व विभागीय कार्यालय : ०२५३ – २५०४२३३
नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय : ०२५३ – २५७०४९३
नविन नाशिक विभागीय कार्यालय : ०२५३ – २३९२०१०
नाशिकरोड विभागीय कार्यालय : ०२५३ – २४६०२३४


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here