Nashik News | लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून विधानसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी प्रक्रिया उद्या शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. अवघ्या काही तासातच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यात यंदा मतदानात वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून मतमोजणीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून राज्यसभेत नाशिक जिल्ह्यातील बहुतांश जागांवर अत्यंत प्रतिष्ठेचा व अटीतटीचा सामना होता. त्यामुळे निकालाचा अंदाज बांधणे कठीण आहे.
Nashik News | लोकसभेला मतदान केले, विधानसभेत मतदार यादीत नावच नाही!; नाशकात मतदार यादीतील घोळ उघडकीस
उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात
उद्या प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात आली आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाली मतांची मोजणी केल्यानंतर सकाळी 9 नंतर वोटिंग मशीन मधील मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी सुरू असताना त्याची माहिती त्वरितच निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे.
उद्या जिल्ह्यात त्रिस्तरीय सुरक्षा
तसेच मतमोजणीच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहर व जिल्ह्यातील दारूची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मतमोजणी परिसरात 500 मीटरच्या आवारात वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल कॅमेरा किंवा धुम्रपानास बंदी असणार आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम