Nashik News | देवळालीतील वंचितचे उमेदवार डॉ. अविनाश शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात; घातपात असल्याचा संशय!

0
70
#image_title

Nashik News | देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अविनाश शिंदे यांच्या वाहनाला काल मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. दरम्यान राज्यभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांकडे पाहता हा अपघात की घातपात अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Nashik News | सुधाकर बडगुजरांविरूद्ध अंबड पोलीसांत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय…?

मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान अपघात 

वंचितचे उमेदवार डॉ. शिंदे काल मध्यरात्री प्रचार कार्यालयाकडे जात असताना वडनेर आर्टिलरी सेंटर गेट जवळ त्यांच्या वाहनाला मागच्या बाजूने जोरदार धडक बसली. या धडकेत वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून शिंदे यांच्या मानेला तसेच पाठीला जबर दुखापत झाली आहे. मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान हा अपघात घडल्याने त्यांना तातडीने मदत मिळू शकली नव्हती. परंतु, सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले असून यावेळी पोलिसांशी संपर्क करण्यात आला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

अपघात की घातपात? पोलिसांकडून शोध सुरू

सदर अपघाताची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तातडीने त्याची दखल घेतली असून या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हा अपघात होता की घातपात याचा तपास करीत आहेत. दरम्यान उमेदवार डॉ. शिंदे यांचे बंधू बजरंग शिंदे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली असून ‘वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार स्पर्धेत आहे त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून हा अपघात घडवला गेला नसावा असे आम्हाला वाटते.’ असे म्हणत संशय व्यक्त केला आहे.

Nashik News | नाशकात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

गेल्या 24 तासात मतदारसंघात राजकीय घडामोडी सुरूच

याशिवाय गेल्या 24 तासात देवळाली मतदारसंघात इतरही अनेक घटना घडल्या असून सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवारासाठी आलेल्या 1 पूर्णांक 98 कोटी रुपये प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर काल मध्यरात्री विविध उमेदवारांच्या प्रचारकांच्या निवासस्थानी निवडणूक यंत्रणेने शोध घेतल्याचे बोलले जात असून देवळाली मतदारसंघात घडणाऱ्या घटनांमुळे मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here