Political News | ‘बविआ’चा उमेदवार फुटला?; सहा तास राडा घालून अखेर हितेंद्र ठाकूर तावडेंसोबत रवाना

0
44
#image_title

Political News | बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून विरार येथील हॉटेलात विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले होते. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता. सकाळपासून हे राजकीय नाट्य सुरू असून आता यात मोठा ट्विस्ट आला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Political News | ‘बविआ’च्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरले, कार्यकर्त्यांमध्ये जुंपली; नेमकं प्रकरण काय?

सुरेश पडवींचा भाजपत प्रवेश

या प्रवेशामुळे ‘बविआ’ला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला असून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार होणार आहे याला एक दिवसच बाकी असताना सुरेश पाडवी यांनी भाजप प्रवेश करत ‘बविआ’ला धक्का दिला आहे.

Political News | निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कायदा-सुव्यवस्था विस्कळीत; नेत्यांवरील हल्ले वाढल्याने निवडणूक प्रक्रियेला गालबोट

हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे एकाच गाडीत

तसेच हितेंद्र ठाकूर यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला. त्यानंतर विनोद तावडे हे आमचे मित्र आहेत, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे एकाच गाडीतून रवाना झाले आहेत. हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा गाडी चालवत असल्याची माहिती आहे. आधी आरोप करत राडा केला आणि आता एकत्र एकाच गाडीतून रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here