Nashik News | बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी लेखानगर येथील लष्कराच्या सीडीए कार्यालयात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय) छापा टाकला. लष्कराच्या लेखा व कोशागार (सीडीए) विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून ही छापेमारी करण्यात आली असून बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत छापेमारी सुरू होती.
Nashik News | निवडणूक विभागात कर्मचारी नेमणुकीत गोंधळ; शिपाई कर्मचाऱ्याची केंद्राध्यक्ष पदी नेमणूक
सीबीआयकडे भ्रष्टाचार व लाचखोरीच्या तक्रारी
याविषयीची अधिकची माहिती अशी की, सीबीआयच्या पथकाकडून कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून या तपासातून सीबीआयच्या ‘एसीबी’च्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याची माहिती आहे. नाशिकमधील केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात भ्रष्टाचारासह लाचखोरी होत असल्याच्या तक्रारी सीबीआयकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सीबीआयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते.
Nashik News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; 45 सराईत तडीपार
राणेनगर येथील कार्यालयावर छापा
त्यानुसार, बुधवारी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राणेनगर येथील कार्यालयात छापा टाकत झडती घेण्यात आली. ही झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कार्यालयातील काहींची चौकशी करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम