Nashik Accident | नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी आडगाव जवळील धात्रक फाटा परिसरात, खड्ड्यामुळे अपघात होत दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Nashik Accident | नाशिकमध्ये पुन्हा एसटी अपघात; २० हून अधिक प्रवासी जखमी
कशी घडली घटना?
सविता संजू शिरसाट असे अपघातात नृत्य पावलेल्या महिलेचे नाव आहे. सविता या त्यांच्या मुलासह गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास सीबीएसच्या दिशेने जात होत्या. जत्रा हॉटेलजवळील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने मागे बसलेला सविता खाली पडल्या ज्यामध्ये त्यांना गंभीर मार लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारदरम्यान, त्यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Nashik Accident | राहुड घाटातील अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू; दोन प्रवासी देवळा तालुक्यातील
अपघातांचा सत्र थांबेना
तर आठ दिवसांपूर्वी शहरात गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना घडली होती. ज्यामुळे शहरातील अशासकीय गतिरोधकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच आता खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातून आणखीन एक जीव दगावला असल्याने या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. शहरांमधील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात वाढले असून खड्डांमुळे लोकांना शारीरिक ईजाई होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम