Nashik News | देवळा व चांदवड तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रेणुका मंगलकार्यालयात सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केदा नाना मित्रपरीवाराकडून करण्यात आले आहे.
Nashik News | नाशिकमधून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत या तीन नावांची चर्चा
केदा आहेर यांच्या संकल्पनेतून मेळावा आयोजित
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नाफेडचे संचालक केदा आहेर यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या रोजगार मिळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात दिव्यांग तरुण-तरुणींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच निवड झालेल्या तरुण-तरुणींना तात्काळ नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. दहावी ते पदवीधर तरुण-तरूणींना यातून चांगली संधी मिळणार आहे.
Nashik News | ट्रेकिंगसाठी हरिहर गडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; व्हिडिओ व्हायरल
मेळाव्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
चांदवड व देवळा हे दुष्काळी भाग असून या ठिकाणी पाण्याअभावी औद्योगिक क्षेत्राचा अभाव असल्याने स्थानिक तरुण-तरुणींना तात्काळ रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथील बेरोजगार तरुण- तरुणींना एक संधी मिळावी यासाठी केदा आहेर यांनी राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित कंपनी चालकांशी संवाद साधून चांदवडला हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम