Nashik News | नाशिकमध्ये दादा गटाला मोठा धक्का; आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

0
42
Nashik News
Nashik News

Nashik News : नाशिक :  नाशिक शिक्षक मतदार संघात एकामागोमाग एक ट्विस्ट येत असून, या चौरंगी लढतीची चुरस वाढली आहे. आधीच नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीत फुट पडली असून, शिंदे गटाच्या उमेदवारा विरोधात अजित पवार गटानेही उमेदवार दिला आहे. महायुतीत नाशिक शिक्षक मतदार संघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला आली असली तरीही युती धर्म मोडत अजित पवार गटानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. (Nashik News)

त्यामुळे नाशिक शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत शिंदे गटाचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे मैदानात आहेत. त्यामुळे अता नाशिकमध्ये चौरंगी आढत रंगली असून, तगडे उमेदवार मैदानात असल्याने ही लढत चुरशीची होणार आहे. (Nashik Teachers Constituency Election)

Dindori Lok Sabha Result | भाजपने ओवर कॉन्फिडन्समुळे दिंडोरीचा बालेकिल्ला गमावला; निकालाची वैशिष्ट्य काय?

दिंडोरीच्या आमदारांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा 

यातच आता आणखी एक मोठी बातमी नाशिकच्या राजकारणातून समोर आली होती. यानुसार, अजित पवार (Ajit Pawar) गटाचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narahari Jhirwal) यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे (Sandip Gulve) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महायुतीत शिंदे गटासह म्हणजे अजित पवार गटाचाही उमेदवार रिंगणात असूनही नरहरी झिरवाळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एवढंच नाहीतर नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचे काम करण्याच्या देखील सूचना केल्या आहेत. कौटुंबिक संबंध असल्यामुळे संदीप गुळवेंना पाठींबा देत असल्याची जाहीर घोषणा नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली असता, यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठींबा दिल्याचे जाहीर केले.  (Nashik News)

Nashik Teachers Constituency Election | नाशकात शिंदे-पवार गट विरोधात; भुसे-भुजबळांची प्रतिष्ठा पणाला

Nashik News | झिरवाळ यांचे स्पष्टीकरण 

ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नुकताच काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीचे गिफ्ट देण्यात आले. तर, महायुतीकडून शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार किशोर दराडे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर, अहमदनगर येथील भाजपचे युवानेते विवेक कोल्हे हेदेखील अपक्ष उमेदवार असून, अजित पवार गटाकडून धुळे येथील महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार झिरवाळ यांनी संदीप गुळवे यांना पाठिंबा देताना “नाशिक शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून गुळवे यांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्टीकरण दिले.  (Nashik Teachers Constituency Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here