Nashik News | नाशिक हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले असून, गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळताय. यातच आता आणखी एक मोठी बातमी नाशिकमधून समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तडीपारीची नोटीस बजावली असून, आज सकाळी ७ वाजता ही तडीपारीची नोटीस घेवून पोलीस बडगुजर यांच्या घरी धडकले. मात्र, बडगुजर यांनी ही नोटीस स्वीकारली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंची आज ‘मोठी’ चौकशी; काय खुलासे होणार..?
सुधाकर बडगुजर हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आतंकवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणानंतर ते राज्यभरात चर्चेत आले होते. याच सलीम कुत्ता डान्सप्रकरणी त्यांना ही नोटीस बाजवल्याची माहिती आहे. त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने नाशिक महानगर पालिकेतील पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांची चौकशी देखील सुरू होती. सध्या ते उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्राचरातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असून, मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंच्या अडचणींत वाढ; ‘फार्महाऊस’चं गुपित समोर..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम