Nashik News | नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे सुरुवातीला महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी हेमंत गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवली. नाशिक लोकसभेची निवडणूक २० मे रोजी पाचव्या टप्प्यात पार पडली असून, आता देशात सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे.
Shantigiri Maharaj | मतदान केंद्रावर महाराजांच्या चिठ्ठ्या वाटल्या; सहकारी पोलिसांच्या ताब्यात
Nashik News | भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवणार
दरम्यान, यातच त्यांनी एक मोठी घोषणा केली असून, शांतीगिरी महाराज आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) प्रचार करणार आहेत. मोदींच्या प्रचारासाठी शांतीगिरी महाराज शनिवारी वाराणसीला रवाना होणार आहेत. वाराणसीत आपला भक्त परिवार असल्याचा महाराजांचा दावा असून, मोदींच्या प्रचारार्थ ते तिथे साधू महंताची भेट घेणार आहे. तर, नरेंद्र मोदी हे माझे राजकारणातील आदर्श असल्याने आपण त्यांचा प्रचार करणार असल्याचेही महाराजांनी यावेळी सांगितले. तर, भाजपमध्ये जायचं की नाही हे ४ जूनच्या लोकसभा निकालानंतर ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.
Shantigiri Maharaj | ईव्हीएमला घातला हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम