Nashik News | येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माणिकराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी शिंदेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत भुजबळांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याचा हिशोब घेण्याची ही निवडणूक असल्याचे सांगितले आहे.
ही निवडणूक मंत्री छगन भुजबळ यांचा हिशोब घेण्याची
शिंदे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी विविध घटकातील मतदार त्यात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्क नेते जयंत दिंडे, माजी आमदार मारोतराव पवार, खासदार भास्कर भगरे, सोनिया होळकर, विठ्ठल शेलार, योगेश सोनवणे, शिवा सुराशे, सुभाष निकम इत्यादींसह महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी “येवला मतदारसंघातील ही निवडणूक जातीपातीची किंवा जातीयवादाची नसून या निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व महायुतीत काय सुरू आहे, हे पहायला जातो असे सांगून फसवणाऱ्या मंत्री छगन भुजबळांचा हिशोब घेण्याची निवडणूक आहे” असे म्हणत भुजबळांवर निशाणा साधला.
भुजबळांना दिवाळीच्या शेवटच्या शुभेच्छा
“मागील 20 वर्षे या मतदारसंघात कोणतेही काम झालेले नसून एक रुपयाचे काम झाले असेल तर 70 ते 75 टक्के रक्कम कुठे गेली याचा पत्ता लागलेला नाही. संपूर्ण तालुक्यात फक्त दहा-वीस लोक मोठे करण्याचे काम भुजबळांनी केले असून मंत्री छगन भुजबळ यांनी माझा उल्लेख करीत मला मित्र म्हटले. सहकारी असल्याचा उल्लेख केला, परंतु त्यांनी मला शुभेच्छा दिल्या नाहीत. मी मात्र त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. येवल्यात या दिवाळीच्या त्यांना शेवटच्या शुभेच्छा असतील. येवल्याची ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून जनताच निवडणुकीत काय करायचं तो फैसला करणार आहे .जनतेने भुजबळ यांना पराभूत करण्याचा निर्णय घेतला असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही.”
Nashik Political | राष्ट्रवादीकडून पुन्हा दिलीप बनकरांना संधी; भाजपाच्या यतीन कदमांचा हिरमोड
येवल्यातील राजकारण तापणार
तर येवला मतदारसंघाच्या या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असून जरांगे पाटील बुधवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. यावेळी ते येवला मतदारसंघाबाबत काय भूमिका घेत येईल हे पहाणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांच्यावर केलेले आरोपांनी राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम