Nashik News | आज नाशिकमध्ये जणू लोकसभेचा रणसंग्राम सुरू असून, सर्व उमेदवारांसाठी त्यांच्या पक्षांचे दिग्गज नेते हे मैदानात उतरले आहे. भारती पवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची, राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आणि भास्कर भगरेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली असून, काल या आंदोलकांना नोटिस बजावल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. याता शिवसेना ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले असून, जिल्ह्यातील विविध कांदा उत्पादक संघटनांनाही नोटिस बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. तर, यातच लासलगाव येथे काही शेतकऱ्यांनी सकाळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि कांदा निर्यात बिनशर्त हटवण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले.
Nashik News | व्हाट्सअॅप ग्रुपचे ॲडमिनही ताब्यात
दरम्यान, या आंदोलन करणाऱ्या तब्बल १५ शेतकऱ्यांना लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळांसह ताब्यात घेतले आहे. तसेच येथील शेतकऱ्यांचे व्हाट्सअॅप ग्रुपचे ॲडमिन व लासलगाव शहर विकास आघाडीच्या एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांकडून नोटीसा बजावण्यत आल्या आहेत.
पंतप्रधानांना शेतकऱ्यांची भीती..?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांना नोटीसा बजावल्या असून, पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. तर, पोलिसांकडून नोटीस देत त्रास दिला जात असल्याचे आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेजारील देश चीन आणि पाकिस्तानला घाबरत नाही, मात्र त्यांना आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची भीती आहे..? असा सवालही त्यांनी यावेळी केला. जर शेतकऱ्यांना सभेला जाऊच देत नाहीये तर मग या सभा घेताच कशाला..? असा सवाल्हि त्यांनी केला.
PM Modi in Nashik | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, देवळ्यातील आंदोलक ताब्यात
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम