Nashik News | नाशकात कठोर कारवाईस सुरवात; प्रशासन ऍक्शन मोडवर  

0
19

Nashik News | नाशिक जिल्हा विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर असला तरी मागील 11 महिन्यात शहरात तब्बल 36 हत्यांचे गुन्हे घडून आलेले आहेत. मागील पाच वर्षांतील रेकॉर्ड मोडणारे ह्या गुन्ह्यांची संख्या दिसत आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची उचलबांगडी झाल्यानंतर संदीप कर्णिक यांना नाशिक शहराच्या कायदा सुव्यस्थेची जबाबदारी मिळाली असून संदीप कर्णिक हे नाशिक पोलीस आयुक्त पदावर आरूढ होताच नाशिक पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलेलं दिसत आहेत. नाशिक शहराच्या हद्दीत 30 हत्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. नाशिकच्या विविध भागांत पोलिसांनी आता कारवाई करण्यास सूरवात केलेली आहे.
कोण आहेत संदीप कर्णिक?
 
संदीप कर्णिक हे यापूर्वी पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणुन कार्यरत होते. संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलीस आयुक्तपदावर काम करत होते त्यातच गणेशोत्सव बंदोबस्त आणि इतर महत्त्वाच्या धुरा कर्णिक यांनी सांभाळल्या आहेत. शहराचे सहपोलीस आयुक्तपद भूषविताना कर्णिक यांनी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे. गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत कर्णिक यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून विविध संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात कर्णिक यांची उपस्थिती असायची. आता संदीप कर्णिक हे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून काम पहात आहेत.
नाशकात कठोर कारवाईस सुरवात
 
नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता विविध माध्यमांतून शहरात कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करून शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न कौतुकस्पद असून नाशिक पोलीस यांच्या ट्विटर हॅण्डल द्वारे वेळोवेळी माहिती पोहचवली जात होती परंतु आता नागरिकांच्या समस्या देखील आता सोडवता येत आहेत.  त्यातच विशेषत महिलांच्या तक्रारीवर लगेच कारवाई होताना दिसत आहेत.

Job Alert | ’10’ वी पास उमेदवारांनाही भारतीय नौदलात नोकरीची संधी!

सोशल मीडियावर आलेल्या तक्रारीचं केलं निरसन
 
नाशिक शहर पोलिसांकडून ट्विटर हॅण्डल वर आलेल्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही होताना दिसत आहे.  याशिवाय महिलांच्या तक्रारीवर प्राधान्य देण्यात येईल आणि लगेचच कारवाई होईन असं या हँडलवर सांगण्यात येते आहे. नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी आता नाशिक पोलीस प्रशासन घेतांना दिसत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता सुरक्षेचं वातावरण मिळत आहे.
तुम्ही कुठे करू शकता तक्रार?
 
तुम्ही देखील तुमच्या परिसरातील किंवा अन्य भागांतील होणाऱ्या समस्यांची तक्रार @nashikpolice या ट्विटर हॅण्डलवर करू शकतात त्यावर लगेचच तुम्हाला रिप्लाय येतो आणि कारवाई सुरू होते. (Nashik News)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here