Nashik News | नाशिकमध्ये रंगेल पतीचा पाठलाग करत पत्नी पोहोचली मसाज पार्लरमध्ये; पुढे काय घडलं बघाच…

0
34
Nashik News
Nashik News

Nashik News | पती आणि पत्नीचे नाते हे विश्वासावर टिकून असते. यात विश्वास डगमगला की नाते कमकुवत होते. अशीच एक नवरा बायकोची फिल्मी स्टाइल घटना नाशिकमध्ये घडली आहे. पतीवर संशय घेत पत्नीने त्याचा पाठलाग केला आणि ती थेट मसाज पार्लरमध्ये (massage parlour) पोहोचली.

पतीचे दुसऱ्या महिलेशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्याचा पाठलाग सुरु केला. त्यात पत्नीला यश आले आणि पतीचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ती थेट एका मसाज पार्लरमध्ये गेली. ही घटना नाशिक शहरातील पारिजात नगरमध्ये घडली.(Nashik News)

Nashik News | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, पारिजात नगर येथे एका उच्चभ्रू सोसायटीत हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. हे दोघेही उच्चशिक्षित असून, त्या दोघांचाही मित्रपरिवार आहे. मात्र, त्यांच्या नात्यात तिसरी व्यक्ती आली आणि त्यातून नात्यात दुरावा आणि संशय निर्माण झाला. पत्नी नेहमी इतरांशी बोलते आणि इतरांसोबत वेळ घालवते. हे पतीला नेहमी आवडत नसे. त्यामुळे पतीने दुसऱ्या महिलेशी ओळख केली. ओळखीचे रूपांतर मैत्री झाले. त्यामुळे पती बाहेर जास्त वेळ राहू लागला.

Nashik News | नाशिकमध्ये मतदानापूर्वी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस..?

दरम्यान, पती आपल्याला वेळ कमी देतो. घरीही कमी येतो. ही बाब पत्नीच्या लक्षात आली. त्यातून तिने पतीवर पाळत ठेवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने पती दिवसभर कोठे जातो, कोणासोबत असतो, याची चौकशी केली. त्यावेळी तिला पती मसाज पार्लरमध्ये जात असल्याचे समजले. यानंतर तिने पतीचा पाठलागही सुरु केला. दोन दिवसांपूर्वीच तिने पतीचे रेकॉर्डिंग ऐकले होते.(Nashik News)

त्यातून तिला पती पारिजात नगर परिसरातील एका मसाज पार्लरमध्ये जात असल्याचे समजले. तिने थेट मसाज पार्लरमध्ये घुसून इकडेतिकडे पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला पार्लरमधील तेथील लोकांना काही समजले नाही. तिने गोंधळ घातल्याने मसाज पार्लरमधील मॅनेजर आणि तिच्यात वाद झाला.

ही बाब, पतीला समजताच तो धावत आला. दोघांमध्ये जोरदार भांडण आणि हाणामारीदेखील झाली. दोघांतील वाद विकोपाला गेल्याने हे प्रकरण थेट गंगापूर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली.(Nashik News)

Nashik News | मालेगावात ८ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत; ग्रामस्थांकडून रास्ता रोको


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here