Deola | देवळा तालुक्याला प्रथमच एवढे मोठे पद; केदा आहेर यांचे जल्लोषात स्वागत

0
44
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व कळवण शेतकी संघाचे अध्यक्ष केदा आहेर यांची महाराष्ट्रातून नाफेडच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांचे शुक्रवार (दि.२४) रोजी देवळा नगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. देवळा तालुक्याला राष्ट्रीय स्तरावरील कृषी संस्थेचे एवढे मोठे पद प्रथमच मिळाल्याने देवळावासीयांनी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात केदा आहेर म्हणाले की, “शेतकरी बांधवांच्या व जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण हे पद मिळवू शकलो. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी उत्पादनांच्या सहकारी विपणनाला चालना देण्याच्या उद्देशाने आपण प्रयत्नशील राहू. देवळा व चांदवड तालुक्यातील विकास कामांसाठी महत्वाकांक्षी अशा प्रकल्पांना चालना देण्याकामी नाफेडच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत”.

Deola | केदा आहेर यांची नाफेडच्या राज्य संचालक पदी निवड

यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, नितीन आहेर, कारभारी आहेर, देवानंद वाघ, प्रमोद निकम, राहुल सोनवणे, शिवाजी अहिरे, स्वप्नील पाटील, सुनील देवरे, देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, अतुल पवार, अशोक आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, देमकोचे व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम, भारत कोठावदे, महेंद्र पाटील, दिनेश सोनार, योगेश वाघमारे, निंबा धामणे, सतीश देशमुख, दिलीप पाटील, कैलास देवरे, शिवाजी पवार, केदा शिरसाठ, शाहू शिरसाठ, संजय कानड, किशोर चव्हाण, योगेश नानु आहेर, मुन्ना अहिरराव, उमेश आहेर, दीपक बच्छाव, अशोक सुराणा, आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deola | केदा आहेरांमुळे पहिल्यांदाच देवळ्याला शेतकरी संघाच्या नेतृत्वाची संधी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here