Nashik News | निकालापूर्वी उमेदवार देवांच्या ठाई; कार्यकर्त्यांना मात्र सेलिब्रेशनची घाई

0
56
Nashik Lok Sabha Result
Nashik Lok Sabha Result

Nashik News |  अवघ्या काही तासांत मतमोजणीला सुरुवात होणार असून, या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. एकीकडे उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणीच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे बहुतांश उमेदवार मात्र देवांना साकडे घालताना दिसत आहेत. यामुळे या उमेदवारांनाच आपल्या विजयाबाबत शंका आहे की काय..? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू असताना त्यांचे कार्यकर्ते मात्र सेलिब्रेशनची तयारी करताना दिसत आहेत.(Nashik News)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या दि. ४ जून रोजी सकाळी सात वाजेपासून सुरू होणार असून, निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, त्यापूर्वीच या निकालाबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड हूरहूर दिसत आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी तर अक्षरशः देवांचे पायच धरले आहे. यातच नाशिकचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनीही विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे.

Nashik News | भास्कर भगरेही देवदर्शनाला 

त्यांनी तुळजापूर आणि जेजुरीला जाऊनही विधीवत पूजाअर्चना केली. तर त्यांच्यासह दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार भास्कर भगरे (BhaskarBhagare) यांनीही अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या असून, शिर्डी, अजमेर शरीफ, पुष्कर तसेच भद्रा मारुती, नस्तनपुर येथील शनी मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले आणि साकडे घातले.

Hemant Godse | नाशिकमध्ये सभा घ्यायला आल्या; गर्दी न जमल्याने पत्रकार परिषद घेऊन गेल्या..?

विजय झाल्यास १३५ ठिकाणी होर्डींग लावण्याची तयारी

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना मात्र त्यांच्या विजयाची मोठी खात्री आहे. त्यामुळे गोडसेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी देखील केली आहे. निकालापूर्वीच गोडसे यांच्या विजयाचे शहरात १३५ ठिकाणी होर्डींग लावण्याची तयारी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे आघाडिवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, तरीही गोडसे समर्थकांना फुल्ल कॉन्फिडन्स असून, त्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. (Nashik News)

दिवसभर जंगी सेलिब्रेशनची तयारी

तर, या १३५ होर्डींगचे डिझाईन देखील तयार केलेले आहेत. आज दिवसभर गोडसे (Hemant Godse) समर्थक, मतमोजणी प्रतिनिधी हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा आढावा घेत आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जंगी सेलिब्रेशनची तयारी करत होते.
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच मोठा चरचेत राहिला. ही लढत चुरशीची असल्याने आणि अजगा प्रतिष्ठेची असल्याने या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर, या निवडणुकीत निकाल कोणाच्या बाजूने लागतो याबाबत मोठी उत्सुकता आहे.

Hemant Godse | छत्रपती सेनेचा गोडसेंना पाठिंबा; पत्रक काढत कारणही सांगितले..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here