Nashik News : संपूर्ण देशाला उत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) अखेर उद्या जाहीर होणार आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या नाशिकमध्ये वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहे. नाशिकमधील अंबड येथील वेअर हाऊस या ठिकाणी सकाळी आठ वाजेपासून ही मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पदाधिकाऱ्यांसाठी येण्याचे मार्ग हे स्वतंत्र ठेवण्यात आले असून, त्यासोबतच या भागात पोलिसांचाही (Nashik Police) मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
नाशिक शहरातील अंबड एमआयडीसीतील ग्लॅस्को कंपनीजवळ असलेल्या सेंट्रल वेअर हाऊस येथे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघांसाठी जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून वेअर हाऊसकडे येणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग केले आहे. तसेच पोलिसांच्या राहूट्यादेखील उभारल्या आहेत. या मतमोजणी केंद्रात मोबाइल, लॅपटॉप असे कोणतेही साहित्य नेण्यास बंदी असून, निवडणूक विभागाचे अधिकृत ओळखपत्रे असलेल्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. (Nashik News)
Nashik News | संतापजनक..! नाशिकमध्ये दोन महिन्यांच्या मुलीची विक्री; आईसह ९ जण ताब्यात
दिंडोरीचा निकाल चार वाजेपर्यंत आणि नाशिकचा निकाल सहा वाजेपर्यंत
दरम्यान, मतमोजणी (Lok Sabha Election Result) केंद्रावर उमेदवारांच्या कार्यकत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, दिंडोरी लोकसभेचा निकाल सायंकाळी चार वाजेपर्यंत आणि नाशिक लोकसभेचा निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
Nashik News | हे मार्ग बंद
१. जेमिनी इंस्ट्राटेक कंपनी – अंबड एम.आय.डी. सी. – अंबड वेअर हाऊस – पावर हाऊस या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद
२. ग्लॅक्सो कंपनी मेन गेट – अंबड लिंक रोड – संजीवनी बोटनिकल नर्सरी या मार्गावर अवजड वाहतुकीस मनाई
३. अंबड गाव – दोंदे मळा या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद
असे आहेत पर्यायी मार्ग
१. जेमिनी इंस्ट्राटेक कंपनी ते उज्ज्वल ह्युंडाई ते गरवारे
२. गरवारे ते पावर हाऊस मार्गे एक्स्लो पॉइंट
३. अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणारी वाहने अजिंठा हॉटेलमार्गे एक्स्लो पॉइंटकडून वळण घेऊन जाऊ शकतील.
Nashik News | नाशिकमध्ये रंगेल पतीचा पाठलाग करत पत्नी पोहोचली मसाज पार्लरमध्ये; पुढे काय घडलं बघाच…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम