Nashik News | चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अपघात; एकाच मृत्यू, ३ गंभीर जखमी

0
135
Nashik News
Nashik News

Nashik News | राज्यात सध्या अपघाताच्या घटना वाढत असून,  पुणे अपघातानंतर आता वरळी हीट अँड रन प्रकरण राज्यभरात चांगलेच पेटलेले असताना, नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली  आहे. नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच हिट अँड रनची घटना घडली आहे. परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू असतांना हा मोठा अपघात घडला आहे. चांदवड तालुक्यातील हरणुल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतुक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटली आणि हा भीषण अपघात घडला आहे.

Deola | ‘दि देवळा मर्चंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक

दरम्यान, स्कॉर्पिओ उलटून अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला आहे. तर पथकातील ३ कर्मचारी गंभीर जखमी असून त्यात २ पोलिसांचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटर या पथकाने क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. या दरम्यान अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहे. घटना स्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फौजफाट्यासह पोहचले असून अधिकचा तपास सुरू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here