सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा – मालेगाव रस्त्यावर पावजी बाबा फाट्यानजीक शनिवारी (दि. ६) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्या वाहनातील कुटुंबातील चार जण जखमी झालेत. या घटनेबाबत रात्री उशिरा देवळा पोलिसांत मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Deola | ‘दि देवळा मर्चंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावकडून कळवणकडे जात असलेल्या एम.एच. ४१ – झेड – ७४११ व कळवण कडून मालेगावकडे जात असलेल्या एम.पी. झेड जे – ८३१३ या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात कळवण येथील रहिवाशी व देवळा व वणी मर्चंट बँकेचे माजी व्यवस्थापक गणेश सुभाष ततार (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला तर समोरील वाहनातील चार जण जखमी झालेत. अपघातानंतर पावजी बाबा मित्र मंडळाच्या व स्थानिक कार्यकर्त्यांना धाव घेत अपघातील जखमींना तात्काळ देवळा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. जखमी प्रवाशी हे मध्ये प्रदेशातील आहे. ते सप्तशृंगी गडावरून देवदर्शन आटोपून परत येत होते. अपघातात मृत झालेले गणेश ततार (रा. कळवण) यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, एक मुलगा, एक मुलगी दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने कळवण-देवळा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम