राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात गेल्या एक दोन महिन्यांपासून जिओ नेटवर्कचा सर्रासपणे लपंडाव सुरू असून या मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे या परिसरातील सुमारे पन्नास हजार लोकसंख्येच्या भागातील वाड्या वस्त्यांमधील ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, सध्याच्या पावसाळी परिस्थितीत या भागातील मध्यवर्ती केंद्रबिंदू असलेल्या टाकेद बु. याठिकाणी सेतू कार्यालय, बँकिंग सेवा, आधार सेवा अश्या ठिकाणी विविध शासकीय योजनांचे अर्ज भरण्यासाठी, विद्यार्थ्यांचा दैनंदिन ऑनलाइन अभ्यासक्रम, शेतकरी बांधवांचा महा डीबीटी पोर्टल वर चालू असलेला पीक विमा, सायबर कॅफे, कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रात शिकत असलेले विद्यार्थी, महाविद्यालय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन विविध दाखले अशी अनेक कामे ही आजच्या डिजिटल नेटवर्क सिस्टीमवर अवलंबून आहेत.
परंतु गायब होत असलेला नेटवर्कमुळे या ऑनलाइन प्रणालीवर आधारित असलेल्या कामांना मोठे अडथळे निर्माण होत असून यात शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थी, महिलांची मोठी गैरसोय होत आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने या परिसरातील मोबाइलद्वारे संपर्क करणेही अवघड झाले आहे. नेटवर्क कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या. पण ग्रामीण भगात अजूनही नेटवर्कच्या समस्या तशाच आहे. त्यामुळे नागरिकांचा रीचार्ज करूनही काही उपयोग होत नाही. याउलट त्यांचे रीचार्जचे पैसे वाया जातात. पैसे मोजलेले असतांनाही संबंधित मोबाईल नेटवर्क कंपनीकडून ग्राहकांना योग्य दर्जाची सेवा मिळत नसेल तर ते सिम घेऊन आणि महागडे रीचार्ज करून उपयोगच काय..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
Sandip Jagtap | नाशिकमधील ‘शेतकरी कवी’ संदीप जगताप यांच्या कविता साता समुद्रापार
सध्याच्या काळात इ-पीक पाहणी अँपचे सर्व्हर डाऊन होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, ग्राहकांना कुठल्याही ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येत नाही. दरम्यान टाकेद परिसरात टाकेद, धामणगाव,परदेशवाडी,खेड,आंबेवाडी, भंडारदरावाडी,अधरवड आदी गावांसह बहुतांश गावांमध्ये जिओ ,आयडिया, वोडाफोन, BSNL, एअरटेल आदी कंपन्यांकचे नेटवर्कचे टॉवरही उपलब्ध आहेत. परंतु तरीही याचा काही फायदा नसून, नेटवर्कचा लपंडाव हा सुरूच आहे. या सततच्या नेटवर्कच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त होऊन जिकिरीला आले आहेत.
सध्याच्या मानवी जीवनात मोबाईल आणि इंटरनेट हे जीवनावश्यक बनले आहे, असे असताना या भागांमध्ये नेटवर्कच्या समस्येने नगरिक संतापले आहे. तर, नेटवर्क सेवा सुरळीत न झाल्यास ग्राहकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित मोबाईल कंपन्यांना दिला आहे. अवाजवी पद्धतीने मोबाईल रिचार्जमध्ये दिवसेंदिवस दरवाढ होत असली तरीही ग्राहक रिचार्ज मारतात. पण तरीही नेटवर्क सेवा उपलब्ध होत नसेल तर हा सामान्य ग्राहकांवर अन्याय आहे, असे म्हंटले तरी काहीही वावगे ठरणार नाही. तरी संबंधित कंपन्यांनी टाकेद परिसरातील मोबाईल नेटवर्क प्रश्नावर गांभीर्याने लक्ष्य घालून तात्काळ समस्या सोडवावी अशी सर्व ग्राहकांची मागणी आहे.
Igatpuri | जि.प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत वाढदिवस साजरा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम