Nashik | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना आयोजित “विशेष श्रमसंस्कार शिबिर” दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत काचुर्ली तळेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या सात दिवसीय शिबिराचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना आणि शिबिरार्थीना शिबिरातील दैनंदिन कार्याविषयी मार्गदर्शन केले आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनात स्वतःच्या विकासासाठी कसा करता येईल या विषयी मार्गदर्शन केले.(Nashik)
Nashik | त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात ‘कॉलेज कट्टा बनला वाचन कट्टा’
Nashik | श्रमदान हेच सर्व श्रेष्ठ दान – ॲड. नितीन ठाकरे
दरम्यान, यावेळी ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, “रासेयो शिबीर हे संस्काराचे केंद्र असून सहभागी स्वयंसेवकांसाठी ही संधी असून तुम्ही राबवीत असलेल्या जल व्यवस्थापन, लोकसंख्या नियंत्रण, मतदानाचा हक्क आदीबाबत युवकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. कार्यक्रमांचा उपयोग हा स्थानिक गाव व समाजाच्या विकासाला सहायक ठरायला हवा. श्रमदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे.”
या प्रसंगी प्रमुख पाहुणे संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी “विद्यार्थी हा समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्यावर संस्कार घडविण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांची आवश्यकता आहे. श्रम निष्ठा, संघटन, नेतृत्व गुण याचा विकास अशा शिबिरातून होतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्वात आवश्यक तो बदल घडवावा.” असे मत त्यांनी व्यक्त केले.(Nashik)
Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पिंगळे (नाशिक ग्रामीण संचालक) यांनी “व्याख्याने श्रमदानातून विद्यार्थ्यांनी स्वतःला परिपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या कार्यपुस्तीकेचे प्रकाशन कण्यात आले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ११,००० रुपयांचा धनादेश सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड. भास्कर मेढे, उपाध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्याध्यापक श्री. गौतम कटारे, श्री. संजय बांगारे आदींसह ग्रामस्थ, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.(Nashik)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम