विद्यार्थी केंद्रित काम करण्याचे हेच कार्यकारी मंडळाचे धेय्य – अॅड नितीन ठाकरे

0
2

नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणामुळे सध्या नवनवे बदल शिक्षण व्यवस्थेत होत आहेत. इ-लर्निंगच्या माध्यमातून चांगले काम करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रगत करता येईल, यासाठी व्हर्चूअल क्लासरूम ही संकल्पनाही आपण विद्यार्थ्यांना केंद्रित करून राबविणार असल्याचे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

येथील रावसाहेब थोरात सभागृहात केटीएचएम महाविद्यालयाच्या वतीने मविप्र संस्थेच्या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाच्या सत्कार सोहळा पार पडला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल व संचालक मंडळ, सेवक सदस्य, शिक्षणाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, उपप्राचार्य पी. व्ही. कोटमे आदि उपस्थित होते.

यावेळी ठाकरे यांनी पुणे विद्यापीठांतर्गत असणारे केटीएचएम महाविद्यालय संख्येने मोठे असून गुणात्मकदृष्ट्या देखील अग्रेसर आहे. या महाविद्यालयातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी संस्थेच्या वतीने लवकरच एक अकॅडमिक कौन्सिल तयार करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाईल, असे आश्वासन दिले.

तर डॉ. सुनिल ढिकले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केटीएचएम महाविद्यालय हे संस्थेचे मुकुटमणी असल्याचे सांगून संस्थेने आणि महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक हीच महाविद्यालयाची ओळख असून कोरोनाकाळात महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सर्व नूतन कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले असून सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here