Skip to content

जिल्ह्यातील वाढत्या बेठबिगारीच्या घटनांवरून राज ठाकरे आक्रमक


नाशिक : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून लहान मुलांना बेठबिगारीसाठी पाठवण्याच्या घटनांत वाढ होत नाही. फक्त जिल्हाच नाही, तर ठाणे अहमदनगर व पालघर या जिल्ह्यातही अशा घटना होत आहे. या मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात व राज्यात लहान मुलांना गरिबी व पैश्यांभावी त्यांची विक्री करून बेठबिगारी करण्यास प्रवृत्त केले जात आहे. ह्यातून अनेक मुले बेपत्ता होण्याचा घटनादेखील घडल्या आहेत. ह्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ह्याच लहान मुलांच्या वेठबिगारीच्या मुद्द्यावरून आपल्या सोशल मिडिया अकांऊटवरून एक पोस्ट करत राज्य सरकारने ह्या मुद्द्याकडे त्वरित व किमान सहनुभूतीने लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी अश्या बातम्या पुन्हा वाचायला मिळू नये, ही इच्छा व्यक्त केली.

काय म्हटले राज ठाकरे पोस्टमध्ये ?

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, की गेल्या अनेक दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडला जाण्याच्या बातम्या वाचल्या, त्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये हे वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण वास्तव आहे. त्यासाठी वेठबिगारीचे उच्चाटन करण्यासाठी आज कायद्या असूनही ही प्रथा अस्तित्वात आहे. त्यामुळे प्रगत राज्यात ह्या घटना आढळणे हे शोभणारे नाही.

त्यामुळे अश्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश देत त्या वेठबिगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे व मुलांची सुटका आणि त्यांच्या पुनर्वसनाकडे कमालीच्या सहानुभूतीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

फक्त सरकारने नाही, तर समाजाने ह्यात पुढे येण्याची गरज आहे, असे म्हणत वेठबिगारी सारख्या क्रूरप्रथेच्या निर्मूलनासाठी समाजाने सतर्क राहून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. तसेच असे प्रकार कुठेही आढळल्यास पोलिसांत तक्रार करा किंवा मनसेच्या स्थानिक कार्यालयात व कार्यकर्त्यांना कळवण्याचे आवाहन यावेळी केले आहे. याप्रकरणी आमचे कार्यकर्ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई करतीलच, पण गरज पडल्यास आमच्या स्टाईलने वेठबिगारी करणाऱ्यांना धडा शिकवू. व अश्या बातम्या पुन्हा वाचायला न मिळण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!