बहुसंख्य विरोधी पक्षांचा मुख्य शत्रू कॉंग्रेस व नेहरू घराणं – कुमार केतकर

0
2

नाशिक : जेव्हा जेव्हा कॉंग्रेसने जनतेसमोर चांगल्या योजना आणल्या, तेव्हा तेव्हा त्याला भाजप विरोधच करत आलाय. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांचा विरोध कॉंग्रेसला नव्हे तर नेहरू – गांधी घराण्याला आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी केले आहे.

मुक्त पत्रकार सुरेश भटेवरा लिखित “शोध… नेहरू – गांधी पर्वाचा !” ह्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा लोकार्पण सोहळा काल कालिदास कलामंदिर येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, लेखक व मुक्त पत्रकार सुरेश भटेवरा, राज्यसभा खासदार कुमार केतकर, माजी आमदार उल्हासदादा पवार, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ते बोलताना भाजप व मोदींचा समाचार घेतला. ते म्हणाले, देशात सध्या विरोधकांची द्वेष आणि नफरत हीच भावना अधिक आहे. त्याची सांगड भाजपने धर्माशी जोडून हिंदु राष्ट्रनिर्मितीचा अजेंडा चालविला आहे. तो देशाच्या एकतेसाठी भविष्यात घातक ठरणार आहे. त्यामुळे या विचारांतून देशात फुट पडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. म्हणूनच राहुल गांधीनी लोकांचे मन मोकळे करण्यासाठी ही “भारत जोडो यात्रा” संपूर्ण देशभर काढली आहे.

ते असेही म्हणाले, ह्या देशात महागाई, द्वेषभावनेचे वातावरण असून लोक मात्र यावर बोलत नाही. या लोकांचा आवाज बुलंद व्हावा, यासाठीच राहुल गांधी यांनी ‘नफरत तोडो, भारत जोडो’ ही दीडशे दिवसांची पदयात्रा सुरु केली आहे. मात्र, सत्ताधारी ह्याला कॉंग्रेसचे नाव जोडत असल्याचे फेटाळत ही कॉंग्रेसची नसून ही लोकांची यात्रा आहे. ह्यात कॉंग्रेसचा झेंडा नसून तिरंगा झेंडा आहे, त्यामुळे जे नेते आजवर कॉंग्रेसला बोलत होते, तेही ह्या यात्रेत सहभागी झाल्याचा दावा करत काही विरोधी पक्षातील नेतेही ह्या यात्रेला पाठींबा दिला, असे केतकर म्हणाले.

ते हेही म्हणाले, आज देशात ज्या संस्था आहेत त्याची पायाभरणी नेहरू व गांधी कुटुंबियांनीच केली. मात्र सत्ताधाऱ्यांना हा इतिहासच माहित नाही. व तो नकोय म्हणून त्यांच्याकडून जनतेसमोर खोट्या इतिहासाचा भडीमार केला जात आहे. तसेच, आज काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न बघणारा भाजप  आता ‘काँग्रेसयुक्त’ होत चालला असून काँग्रेसचे नेते त्यांना स्वत:च्या पक्षात हवे मात्र, पंडीत नेहरुंचे विचार नको, असे म्हणत तो संपविण्याचा त्यांचा दावा आहे. तसेच ते हेदेखील म्हटले, की बहुसंख्य विरोधकांचा मुख्य शत्रू हा कॉंग्रेस व नेहरू – गांधी घराणे आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही यावर बोलताना देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे उद्याची पिढी बोलेल. तर ह्यावर आश्चर्य वाटायला नको, अशी भीती व्यक्त करत येत्या काही वर्षात खरा इतिहास जनतेसमोर कळणार आहे, असेही त्यांनी भाजपवर टीका करताना बोलले. यावेळी पाटील यांच्यासह माजी मंत्री भुजबळ, उल्हासदादा पवार यांनीही कॉंग्रेस आणि नेहरू – गांधी परिवाराच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक लोकार्पण पार पडले व त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साईखेडकर यांनी, तर आभारप्रदर्शन गुरमित बग्गा यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here