Nashik Loksabha | दादा भुसेंच्या शिष्टाईला यश; करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश..?

0
41
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  नाशिकच्या राजकारणात सध्या नाराजी नाट्य सुरू असल्याचे दिसत आहे. आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत हा नाराजीचा सुरू उमटताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या दोन टर्मपासून नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना डावलून ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने करंजकर हे नाराज होते.

गेल्या वर्षभरापासून विजय करंजकर हे लोकसभेची तयारी करत होते. मात्र, तरीही त्यांना डावलण्यात आल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आजच विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

Nashik Loksabha | ठाकरेसेनेत बंडखोरी; विजय करंजकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Nashik Loksabha | दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आले असून, हेमंत गोडसे यांच्या विजयासाठी विजय करंजकर यांची माघार करून घेण्यात भुसे यशस्वी ठरले आहेत. विजय करंजकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होताच त्यांची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी तर अजय बोरस्ते यांना उपनेतेपदी बढती देण्यात येणार आहे.

करंजकर यांच्यानंतर आता नाशिकमधील एका मोठ्या महंतांच्या माघारीसाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. करंजकर आणि भुसे मंत्री दादा भुसे यांची घोटी जवळ  ग्रँड परिवार या हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती असून, शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजय करंजकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यासाठी अनेक गाड्या ह्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

Nashik Loksabha | ‘मातोश्री’वरून दुसऱ्यांदा बोलावणे; करंजकरांची ठाकरेंकडे पाठ..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here