नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन निवडणुक ; देवळा तालुक्यातून सात उमेदवारी अर्ज दाखल

0
2

देवळा | सोमनाथ जगताप
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा निंबंधक डॉ सतीश खरे यांनी जाहीर केला असून , उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी देवळा तालुका संचालक पदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

मजूर सहकारी फेडरेशनसाठी मंगळवार दि १ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात करण्यात आली असून, आज सोमवारी( दि ७ ) रोजी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देवळा तालुक्यातुन एक जागेसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग धूसर झाल्यात जमा आहे . माघार २४ नोव्हेंबर रोजी असून, फेडरेशनचे माजी चेअरमन केदा आहेर यांनी फेडरेशन वर आपले वर्चस्व कायम ठेवले असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी चेअरमन व विद्यमान संचालक सतिष सोमवंशी – लोहोणेर, सुनिल धर्मराज देवरे – वाजगाव , अंजली महेंद्रसिंग परदेशी – लोहोणेर, अजय अभिमण आहिरे – देवपूरपाडे,
राजेश मेतकर – देवळा, सुभाष विजय देवरे – देवळा,
सुभाष पुंडलिक गायकवाड – उमराणे यांचा समावेश आहे.

यात तालुका संचालक पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून ,यात कोणची वर्णी लागते. याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल. तालुक्यात एकूण ४६ सभासद आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here