Skip to content

आरक्षित रेल्वे तिकीटांमध्ये मोठा घोटाळा ; नाशिक मधील धक्कादायक घटना


नाशिक प्रतिनिधी : एकीकडे वेटिंगसाठी असल्याने रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याची परीस्थिती, तर दुसरीकडे याच आरक्षित तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगाव येथे अशरफ रशीद खान (वय ३६) या तरुणास आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करत असताना मनमाडच्या वाणिज्य विभागातील पथकाने त्याला पकडले. त्याच्या जवळील विविध रेल्वे स्थानकांची १६ हजारांची तिकिटे जप्त करण्यात आली.

मालेगावमध्ये रेल्वेसाठी आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मनमाड मधील रेल्वे वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना मिळताच या ठकबाजांना पकडण्यासाठी डाव रचण्यात आला. वाणिज्य विभागाचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांना मालेगाव पोस्ट ऑफिसमध्ये अशरफ रशिद खान हा तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचे संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर त्याला पकडण्यात आले.

त्याची चौकशी केल्यानंतर त्याने तिकिटाचा काळाबाजार केलं असल्याचे कबुल केले. हीच तिकिटे प्रवाशांना अधिक किंमत घेऊन विक्री करीत असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्याजवळ विविध स्थानकांची एकूण १६ हजारांची तिकिटे असल्याचे आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!