Spa Center | नाशिकमधील गुन्हेगारी सत्र हे सुरूच असून, शहरात अनेक खुनाच्या तसेच अवैध घटना या समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहर तथा ग्रामीण पोलिसांनी नशिक शहर, सटाणा तथा देवळा येथील काही संशयास्पद अश्लील गोष्टींसाठी जोडप्यांना अवैधरीत्या रूम उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कॅफेवर धाड टाकण्यात आली होती. हे कॅफे बाहेरून कॅफेसारखे दिसत. मात्र, येथे महाविद्यालयीन मुला मुलींना प्रायव्हसीसाठी रूम उपलब्ध करून दिले जात होते. अशा कॅफे आणि कॅफे चालकांवर नशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून कारवाईचे हत्यार फिरवण्यात आले होते. (Spa Center)
Spa Center | नेमकं प्रकरण काय..?
दरम्यान, यातच आता अशीच एक घटना ही नशिक शहरातून उघडकिस आली असून, या घटनेत एका मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले असून, यात नाशिक पुणे रोडवरील ‘विवा स्पा’ या मसाज पार्लरवर नशिक शहर पोलिसांनी ही धाड टाकत कारवाई केली आहे. दरम्यान, या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वैश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून, या ठिकाणाहून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. (Spa Center)
Deola Crime | शहरात अश्लील चाळ्यांसाठी चालणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड
नाशिकरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या विशेष पथकाने स्टार झोन मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विवा स्पा येथे धाड टाकत ही कारवाई केली आहे. या ठिकाणाहून चार महिलांची पोलिसांनी सुटका केली असून, यासोबतच या स्पा सेंटरचा व्यवस्थापक अंकीत उर्फ गोलु साहु (२४), मदतनीस रुपेश बरार आणि मालक मयुर देव या तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Spa Center)
Cafe Raid | कॅफे बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे; पोलिसांची धडक कारवाई
दरम्यान, या प्रकरणी आरोपी अंकीत आणि रुपेश यांना अटक केली असून, या तिघा संशयितांनी संगनमत करून या पीडित महिलांना वेश्यागमनास प्रवृत्त करीत त्यांच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहिल्याचा ठपका पोलिसांनी यांच्यावर ठेवला आहे. तर, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहायक निरीक्षक सचीन चौधरी, उपनिरीक्षक उंडे आदींच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. (Spa Center)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम