Nashik News | नाशकात लाच घेणारा विभागीय तांत्रिक अधिकारी ताब्यात

0
50
#image_title

Nashik News | नाशिकमध्ये लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बचत गट अध्यक्षाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर त्या आदेशाची प्रत देण्याच्या मोबदल्यामध्ये तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाज घेताना विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

Nashik News | नाशकात कांचणे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

सापळा रचत केली कारवाई

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची वहिनी बचत गटाची अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांच्या माध्यमातून स्वस्थ धान्य दुकान मंजूर झाले होते. मात्र यावर विभागीय आयुक्त कार्यालयात अपील सुरू होते. या अपीलाचा निकाल वहिनींच्या बचत गटाच्या बाजूने लागला. त्यामुळे निकालाची प्रत घेण्यासाठी तक्रारदार हे केदारे यांच्याकडे गेले असता त्यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर विभागाकडून तक्रारीची शहनिशा करून सापळा रचण्यात आला. मंगळवारी तक्रारदाराकडून तडजोड करून दहा हजार रुपयांची लाच घेताना केदारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी आता नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here