Nashik Crime | पिंपळगावात टोलनाका परीसरात वाहन तपासणीदरम्यान, 69 लाखांची रोकड हस्तगत

0
78
#image_title

Nashik Crime | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठीक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली आहे. तर नाशिक मधील पिंपळगाव-बसवंत येथे पोलिसांकडून यापूर्वी गांजा व रोकड जप्त करण्यात आली होती. यानंतर आता मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी वाहन तपासणीदरम्यान, तब्बल 69 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. संबंधित संशयित व रोकड आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक टोलनाका परिसरात वाहनांची तपासणी करत असताना हा मुद्देमाल हाती लागल्याची माहिती आहे.

Nashik Crime | नाशिक हादरलं..! माताच बनली वैरीण; सावत्र आजोबा, वडिलांकडून चिमुरडीचा विनयभंग

मंगळवारी दुपारी वाहन तपासणी दरम्यान रोकड जप्त

मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास नाशिकहून धुळ्याच्या दिशेने जाणारे वाहन थांबवून कसून चौकशी केली असता त्यात तब्बल 69 लाख रुपयांची रोकड सापडली असून कागदपत्रांची पडताळणी केली असता 61 लाख रुपयांची रक्कम एचडीएफसी बँकेने एटीएम मशीनमध्ये जमा करण्यासाठी खाजगी कंपनीकडे दिली होती. परंतु उर्वरित आठ लाख रुपयांची रक्कम कुठून आली व कोणाला देणार याबाबत वाहनातील व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळू शकला नाही.

Nashik Crime | नाशकात नाकाबंदीदरम्यान 33 लाख रुपयांची रक्कम जप्त

रोकड व संशयित आयकर विभागाच्या ताब्यात

दरम्यान, आचारसंहिता कालावधीत मतदारसंघावर प्रभाव टाकण्याच्या संशयावरून रक्कम ताब्यात घेतली गेली असून वाहनातील व्यक्ती संदीप रामदास कोरडे, हर्षल अजय बर्वे, देवदास काशिनाथ भदाणे, भरत दत्तू साळवे यांच्यासह वाहनाला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित व्यक्ती व रक्कम यांना आयकर विभागाचे अधिकारी संदीप जुमले यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, भाऊसाहेब धात्रक, मच्छिंद्र कोल्हे, विकास वाळुंज, योगेश हेंबाडे, प्रशांत उगले, नितीन गाढवे, गोकुळ खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here