Nashik Crime | अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले!; पोलिस आयुक्तांकडून 737 व्यावसायिक तडीपार

0
37
#image_title

Nashik Crime | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनुचित प्रकार घडू नये याकरीता बेकायदेशीर अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तडीपारचा बडगा उगारला असून गेल्या दोन दिवसांत शहरातील 737 अवैध व्यावसायिकांवर शहर व जिल्ह्यातून 16 ते 20 व 20 ते 24 तारखे दरम्यान तडीपारी कारवाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतच्या कालावधी परवानगी देण्यात आली आहे.

Nashik Crime | नाशिक हादरलं..! माताच बनली वैरीण; सावत्र आजोबा, वडिलांकडून चिमुरडीचा विनयभंग

अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

तडीपार केलेले बहुतांश संशयित वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित असून आयुक्तांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले असून विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत.

सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून बंदोबस्त केल्यानंतर आयुक्तांनी आता शहरातील अवैध व्यावसायिकांकडे आपला मोर्चा वळवला असून याअंतर्गत गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील चोरी-छुप्यारित्याने सुरू असलेले जुगार, मटके, दारू, अड्डयांवर धडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेंतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता पोलिसांनी अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असलेल्या 737 अवैध व्यावसायिकांना तडीपार करण्यात आले आहे. राजकीय पार्श्वभूमीअसलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव करण्यात आल्याची चर्चा असतानाच आता आयुक्तांनी संबंधितांची अंतिम यादी जारी केली आहे. ज्यामुळे अनेकांची पळता भुई थोडी झाली आहे.

मतदानासाठी नियमांत शिथिलता

दरम्यान, शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या ७३७ संशयित अवैध व्यावसायिकांना 20 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शहरात येऊन आपआपल्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी दिली गेली असून या संशयितांची 16 तारखेला मध्यरात्री ते 20 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच 20 तारखेला दुपारी 2 वाजेपासून 24 तारखेला मध्यरात्रीपर्यंत तडीपारचे आदेश देण्यात आले आहेत. तर यात अवैध व्यावसायिकांबरोबर सराईत गुन्हेगारांचाही समावेश असून यातील बहुतांश संशयित राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.

Nashik Crime | पिंपळगावात टोलनाका परीसरात वाहन तपासणीदरम्यान, 69 लाखांची रोकड हस्तगत

आतापर्यंत तडीपार करण्यात आलेल्यांची संख्या:

पंचवटी येथून 58, आडगाव येथून 35, म्हसरूळ 25, मुंबई नाका 60, भद्रकाली 77, सरकार वाडा 24, गंगापूर 13, अंबड 54, सातपूर 46, चुंचाळे 88, इंदिरानगर 63, नाशिक रोड 89, उपनगर 71, देवळाली कॅम्प 44 अशा एकूण 737 अवैध व्यावसायिकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here