Nashik Crime | नाशकात जिल्हा प्रशासनाकडून अवैधरित्या बायोडिझेल व बनावट डिझेलच्या विक्री विरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी 15 तालुक्यात तपासणीसाठी पथके तैनात केली असून त्यामुळे बायोडाइलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
31 ऑक्टोबरला पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा
दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेतली होती. या भेटीत मागील महिन्यापासून जिल्ह्यात अवैधरित्या विक्री केंद्र सुरू असल्याची तक्रार त्यांनी केली होती. जिल्ह्यातील बहुतांश एलडीओ विक्री केंद्रांनी एनए परवानगी न घेताच विक्री सुरू केली असून कुठल्याही विक्री केंद्राकडे खरेदीचे बिल अथवा इनव्हॉईस नाही. एलडीओ हे स्थानानुसार 3000 ते 6000 लिटर प्लास्टिकच्या टप्प्यांमध्ये साठवलेले आहेत. विक्री युनिटवर कर्मशिल वापरासाठी असे लिहिलेले असताना वजनमाप विभागाकडून पडताळणी न करता विक्री केली जात असून डिझेल वाहनांमध्ये एलडीओ भरताना विक्रीचे बिल देत पोलीस तहसीलदार व तलाठी यांच्यापैकी कोणालाही न हरकत दाखला घेतला असल्याची तक्रार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शर्मा यांच्याकडे केली होती. याबाबत योग्य कारवाई न केल्यास 31 ऑक्टोबरला जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशाराही असोसिएशनकडून देण्यात आला होता.
कामात हलगर्जीपणा व कारवाईत टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई
असोसिएशनच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक व मालेगाव धान्य वितरण अधिकारी तसेच 15 तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात पथके नियुक्त केली असून पथकांच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे असणार आहे. संबंधित पथकांना अवैध बायोडीझेल व बनावट डिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शर्मा यांनी दिल्या आहेत. अवैध बायोडाटा जेल प्रकरणी नियुक्त केलेल्या पथकांचे प्रमुख म्हणून तहसीलदारांवर जबाबदारी असेल, तसेच पथकात संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी वैधमापन शास्त्र निरीक्षक, तेल कंपन्यांचे अधिकारी, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचा समावेश आहे. तपासणी वेळी कामात हलगर्जीपणा व कारवाईत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम