Nashik | एकीकडे अजूनही महायुतीचा नाशिक लोकसभेचा तिढा सुटत नसल्याने मतदारांसह पदाधिकारी संभ्रमात आहेत. तर, दुसरीकडे नाशिक शिवसेनेच्या गोटातून आणखी एक बातमी समोर आली आहे. यानुसार सराईत गुंडांनी शिंदे गटाच्या उपमहानगरप्रमुखाला धमकावल्याची माहिती समोर आली आहे.
“नाशिक लोकसभेचा निवडणूक प्रचार करायचा असेल तर आधी खंडणी द्यावी लागेल”, असे म्हणत काही सराईत गुंडांनी शिंदे गटाच्या उपमहानगरप्रमुखांना धमकावल्याचा प्रकार शहरातील जेलरोड परिसरात घडला. याप्रकरणी नाशिक शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगरप्रमुख शिवाजी लहू ताकाटे (रा. ज्ञानेश्वरनगर, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी, पोलिसांनी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.(Nashik)
Nashik Lok Sabha | तिकीटाच्या शर्यतीतून भुजबळांची माघार; मोदी, शाहांचे मानले आभार
Nashik | नेमकं प्रकरण काय..?
नीलेश पेखळे (रा. मोरेमळा, जेलरोड) व विशाल चाफळकर (रा.पेंढारकर कॉलनी, जेलरोड) अशी या संशयितांची नावे आहेत. यातील पेखळे हा मुख्य सूत्रधार असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक माहितीनुसार ताकाटे हे शनिवारी (दि.२०) जेलरोड कुबेर कॉर्नर येथील शॉपमध्ये आले होते. यावेळी शिंदे गटाच्या उमेदवाराचा आमच्या मोरेमळा भागात प्रचार करायचा असेल तर, आधी २१ हजार रुपये रोख खंडणी द्यावी लागेल’ असा दम त्यांनी ताकाटे यांना दिला.(Nashik)
Nashik Loksabha | ‘मातोश्री’वरून दुसऱ्यांदा बोलावणे; करंजकरांची ठाकरेंकडे पाठ..?
एवढेच नाहीतर यावेळी संशयित आरोपींनी धारदार शस्त्रे दाखवून ताकाटे यांना शिवीगाळही केली. तर, ताकाटे हे तक्रार दाखल करत असतानाच नाशिकरोड पोलिसांनी पेखळेला ताब्यात घेतले. ताकाटे हे उमेदवाराचा जेलरोड, मोरेमळा भागात प्रचार करण्याच्या दृष्टीने नियोजन करत होते. त्यावेळी संशयितांनी ताकाटे यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर ताकाटे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर ते फिर्याद देत असतानाच पोलिसांनी संशयित पेखळे याच्या मुसक्या आवळल्या. यापैकी दुसऱ्या फरार संशयिताचा पोळी शोध घेत आहे. (Nashik)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम