Nashik | राज्यात सध्या ईडी सत्र सुरू असून, विरोधी पक्षांच्या आमदारांनंतर आता नाशिकच्या काही बड्या व्यवसायिकांच्या घरी आज सकाळीच ईडीची धाड पडली आहे. या नवीन वर्षात आगमी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, नाशिकमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
हे व्यावसायिक रडारवर…
दरम्यान, यातच आता आज सकाळी ७ वाजेपासून ईडीचे पथक हे मोठ्या फौजफाट्यासह नशिक शहरात दाखल झाले आहे. या पथकात नागपूर आयकर विभागाचे ४२ अधिकारी आणि ३४ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, नशिक शहरात एकाचवेळी तब्बल १४ ठिकाणी हे सर्च ऑपरेशन राबवले जाणार असल्याची माहिती आहे. या ईडी धाड सत्रात नाशिकमधील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स हे काही बडे बांधकाम व्यावसायिक रडारवर असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Nashik)
MLA Anil Babar | महाराष्ट्राचे ‘पाणीदार आमदार’ हरपले…
Nashik | नेतेमंडळींचे धाबे दणाणले
आता नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलच्या मागील बी.टी. कडलग यांच्याकडे ईडीचे पथक हे तब्बल दहा गाड्यांचा मोठ्या ताफ्यासह पोहोचले आहेत. यामुळे आता शहरातील राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील लहान मोठे सर्वच नेतेमंडळींचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी ७ वाजेपासूनच हे पथक शहरात दाखल झाले असून, एकाचवेळी १४ ठिकाणी हे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. संबंधित व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयांचाही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबा घेतला आहे. यातील तीन व्यवसायिकांवर अवघ्या दीड महिन्यापूर्वीच जिएसटी विभागानंही कारवाई केली होती आणि आता यांना पुन्हा ईडीने धारेवर धरले आहे. (Nashik)
Khichdi Scam | अन् संजय राऊतांनी आरोपींची नावंच वाचून दाखवली…
दरम्यान, शहरातील या बड्या रियल इस्टेट आयकुन आणि ठेकेदारांचे अनेक राजकिय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांच्यासोबत काही व्यावसायिक संबंध असून, यातील काही बांधकाम व्यावसायिक हे बडे सरकारी ठेकेदार आहेत. मात्र, यामुळे आता शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील सर्वांचेच धाबे दणाणले आहे. या चौकशीतून आता काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Nashik)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम