Nashik Crime | दोन वर्षांपूर्वी सिडको येथे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित आरोपीने पोलीस चौकशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर संशयीत दीपकच्या शोधासाठी शहर पोलिसांनी पथके रवाना केली असून पोलीस चौकशीत दीपक मार्फत गोळीबाराची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. तेव्हा आता बडगुजर परिवाराच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात दीपक बडगुजर यांनी सहकार्य न केल्यास त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
Nashik Crime | बडगुजरांच्या अडचणीत वाढ; २ वर्ष जुन्या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल
14 फेब्रुवारी 2022 रोजी सिडकोतील उपेंद्रनगर येथे आरटीआय कार्यकर्ते ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर रात्रीच्या वेळी गोळीबार करण्यात आला होता. त्या हल्ल्यात जाधव जखमी झाले होते. त्यामुळे अज्ञातांविरुद्ध अंबड पोलिसात खुनाच्या प्रयत्नात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या संशयितांना सप्टेंबर 2024 मध्ये शोधण्यात आले. गुंड विरोधी पथकाने तिघांना अटक केली असून मयूर बेदच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर प्रसाद संजय शिंदे आणि अंकुश लक्ष्मण शेवाळे या संशयितांना अटक करण्यात आली. हे दोघेही दीपक बडगुजर यांचे खास आहेत. त्यानंतर अंकुशने प्रसाद मार्फत मयूर बेदला सुमारे दोन लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पुणे येथील चाकण परिसरात शुक्रवारी दि. 13 रोजी मयूर बेदला अटक करण्यात आली. यादरम्यान मयूर बेद व अंकुश शेवाळे यांची शनिवारी रात्री उशिरापर्यंत समोरासमोर बसून पोलिसांनी चौकशी केली. त्या चौकशीमध्ये दीपक बडगुजरचे नाव समोर आले अंकुशने दीपकच्या मध्यस्थीतून मयूर कडे हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
न्यायालयाकडून पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
रविवारी दि. 15 रोजी संशयित आरोपी अंकुश शेवाळे याला न्यायालयात हजर केले असता त्याने पोलीस मारहाण करत असल्याचा दावा केला. तेव्हा न्यायालयाने अंबड पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली व शेवाळेचा ताबा वैद्यकीय चाचणी होईपर्यंत गंगापूर पोलिसांकडे दिला होता. चाचणी पूर्ण झाल्यानंतर अंकुशला पुन्हा अंबड पोलिसांकडे सोपवण्यात आले. यादरम्यान, मारहानी संबंधीत वैद्यकीय अहवाल जिल्हा रुग्णालय न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने अंकुश शेवाळ्याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ केली.
Nashik Crime | नाशकात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार
आत्तापर्यंत झालेल्या तपास
* दीपक बडगुजर आणि अंकुश शेवाळे हे जिवलग मित्र असल्याचे समोर
* अंकुश शेवाळेला मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी अटक
* अंकुशच्या अटके नंतर दीपक बडगुजर फरार
* कट रचून गोळीबार केला असल्याचे तपासात स्पष्ट
* ॲड. प्रशांत जाधव आणि अंकुश शेवाळे आणि इतर संशयतांमध्ये वाद होते
* आर्म ॲक्ट आणि प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणात संशयीतांना अटक पोलीस चौकशी अंतिम नावे उघड
* चौकशीतून निघालेल्या निकषांवर कार्यवाही होणार.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम