Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांची ‘घर कोंबडा’ म्हणत संजय राऊतांवर सणसणीत टीका

0
16
#image_title

Sadabhau Khot | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. “संजय राऊत नावाचा एक घर कोंबडा रोज आरोळी देतो. त्या घर कोंबड्याला मी सांगतो की खुराड्यातून रोज बांग देऊ नकोस. तू एक पत्र लिहून दे. मी ठाकरे गट आणि म्हणून जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहोत. बघूया कोंबड्या तुझ्यात किती जोर आहे.” अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

Sanjay Raut | पंतप्रधान पद नाकारल्याचा गडकरींचा दावा; संजय राऊतांनी केले मोठं वक्तव्य

शरद पवारांवर ही साधला निशाणा

त्याचबरोबर “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आग लावण्याचे काम शरद पवार करत आहेत हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे सगळं दिल्यानंतर हे या राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचे काम करीत आहेत.” असे म्हणत शरद पवारांवर टीका केली. “जी माणसं महाविकास आघाडी मधून निवडून आली आहेत, त्यांनी सरकारला एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना मी खासदार अमुक-अमुक लिहून देतो की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी माझा पाठिंबा आहे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

Dada Bhuse on Sanjay Raut | राऊत सर्वात मोठा डोमकावळा, घाबरतो का मी…; भुसेंचा राऊतांवर पलटवार

रोहित पवारांवरही सोडले टीकास्त्र

“रोहित पवार तुम्ही विद्वान माणूस आहात तरीही, महाराष्ट्रात आग लावत सुटलाय. भाडोत्री सोशल मीडियाची टीम महाराष्ट्रात ठेवली आहे. तुम्ही लिहून द्या की मी मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला पाठिंबा देतो. हे आग लावायचे धंदे महाराष्ट्रात बंद करा लोकसभेला जमलं म्हणून विधानसभेला ही जमेल असं नाही.” अशा शब्दात रोहित पवारांवरही निशाणा साधला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here