Nashik Crime | चांदवड हादरले..!; सात वर्षीय चिमूरड्याची हत्या करून झुडपात फेकला मृतदेह

0
138
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime | नाशिक :  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात (Chandwad Taluka) माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षीय बालकाची हत्या करून मृतदेह झुडपात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव (vadner Bhairav) येथील एका सात वर्षांच्या चिमूरड्याचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह हा एका झुडपात आढळून आला. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Nashik Crime News)

Nashik Crime | नाशकात भरदिवसा एकाचा खून अन् पोलिस अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला

Nashik Crime | नेमकं काय घडलं..?

समोर आलेल्या माहितीनुसार, चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत हे मोलमजुरी करतात.  तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने त्यांच्या सात वर्षीय मुलाचे अपहरण केले होते. यानंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार संतोष भगत यांनी पोलीसांनी दिली होती. बालकाचे अपहरण झाले असावे या संशयाने पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी गावातूनच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.(Nashik Crime News)

Nashik Crime | नाशिकमध्ये भुतबाधा झाल्याचे सांगत भोंदू मौलानाकडून महिलेवर अत्याचार

बेपत्ता बालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह गावातील मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत टाकलेला असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. यानंतर पोलिस तातडीने त्या ठिकाणी गेले आणि शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपातून त्यांनी बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. गावातील एका मंदिराजवळून या लहान मुलाला आपल्या मागे नेत असतानाच एका अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला होता. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेतला असता, अखेर आज बालकाचा मृतदेह सापडला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here