Nashik News | नाशकात एटीएसची मोठी कारवाई; एका स्थानिकासह, तीन बांगलादेशी घुसखोर ताब्यात

0
65
Nashik News
Nashik News

Nashik News | नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली असून, यानुसार एटिएसच्या पथकाने नाशकात मोठी कारवाई केली आहे. यात नाशिकमधून तीन बांगलादेशी घुसखाेरांना ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिकमध्ये हे तीन बांगलादेशी घुसखाेर बेकायदेशिररित्या वास्तव्य करत होते. त्यांच्यासोबत आणखी एका संशयितालाही नाशिक एटीएस (Nashik ATS) व इंदिरानगर पाेलिसांनी अटक केली असून, आता त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात हे बांगलादेशी तिन्ही संशयित केवळ वास्तव्यासाठी येथे थांबल्याचे समाेर आले असून, त्यांच्याकडे कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे काही कटकारस्थान किंवा घातपात आळसयचे अद्यापह उघडकीस आले नसल्याची महिती पाेलिसांनी दिली आहे. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा या भागात हे घुसखोर भाडेतत्वावर घर घेऊन राहत होते.

Nashik Crime | चांदवड हादरले..!; सात वर्षीय चिमूरड्याची हत्या करून झुडपात फेकला मृतदेह

Nashik News | अशी केली कारवाई..?

दरम्यान, यांना इंदिरानगर पाेलिसांच्या मदतीने एटीएस पथकाने रविवारी (दि.१८) ताब्यात घेतले आहे. शनिवारी हे तिघे बांग्लादेशी नागरिक नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार रविवारी (दि. १८) पहाटे तीन वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत इंदिरानगर पाेलिस आणि एटीएसने सापळा रचून या परिसरात तळ ठाेकून थेट कारवाई केली आणि एक बांग्लादेशी महिला आणि दाेन पुरुषांना अटक केली. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी करण्यात आली असून, काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.

या तिन्ही बांगलादेशी नागरिकांकडे त्यांच्या बांगलादेशमधील नागरिकत्वाचे काही पुरावे मिळाले असून या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, हे तिन्ही संशयित बांग्लादेशी नागरिक हे एका स्थानिक नागरिकाच्या वांरवार संपर्कात होते. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली असता या स्थानिक नागरिकाने या तिघांना जागा व इतर बाबी उपलब्ध करुन दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

Nashik News | लाडक्या बहिणींच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री भूसेंची अचानक बँकेला भेट

अटक केलेल्या व्यक्तींची नावं 

बांगलादेशी संशयित – शागोर मोहंमद अब्दुल हसुने माणिक (वय २८), मुस्समत शापला खातून (वय २६), इति खानम मोहंमद शेख (वय २७) हे तिघे बांगलादेशी भारतात घुसखोरी करून नाशिकमध्ये राहत होते. त्यांना येथे मदत करणारा स्थानाईक नागरिक गोरक्षनाथ विष्णू जाधव (वय ३२) या चौघांना अटक करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here