Nashik Crime | नाशिकमधील मोबाईल दुकानांवर पोलिसांचे धाड सत्र; पाच दुकानदार ताब्यात

0
67
Nashik Crime
Nashik Crime

 Nashik Crime | नाशिक शहरातील एमजी रोड परिसरात अनेक मोबाईलची दुकाने असून, हा परिसर मोबाईल दुकानांसाठी ओळखला जातो. या दुकानांमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, मोबाईल हे होलसेल भावात मिळतात. त्यामुळे जिल्हाभरात लहानमोठे व्यावसायिक हे या दुकानांमधून होलसेल भावात माल घेत असतात. या परिसरात आदाजे 150 मोबाइल आणि मोबाइल ॲक्सेसरिजची दुकाने आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथे मराठी व्यावसायिक आणि राजस्थानी व्यवसायिकांमध्ये वाद झाल्यामुळे हा परिसर चर्चेत होता. तर, नाशिक पोलिस आणि स्थानिक आमदारांच्या मध्यस्थीने हा वाद शमवण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा ही मोबाइल दुकाने चर्चेत आली असून, येथील काही मोबाइल दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Nashik Crime)

 Nashik Crime | ‘या’ दुकानांवर कारवाई 

नाशिकच्या एमजी रोडवरील (Nashik MG Road) या दुकानांमध्ये ॲपल (Apple) कंपनीच्या मोबाईलचे बनावट ॲक्सेसरिज विक्री केली जात असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी या दुकानांवर धाड टाकत कारवाई केली. मॉजीसा मोबाईल, एजीएम कॉर्पोरेशन, रिद्धी सिद्धी एम्पेक्स, बालाजी मोबाईल, आशापुरा मोबाईल, या दुकानांमध्ये बनावट ॲक्सेसरिज विक्री होत केली जात असल्याने येथे कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी पाच मोबाइल दुकानदारांना ताब्यात घेतले असून, या दुकानांमधून 3 लाख 52 हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here