BJP | देशभरात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी; जिल्हाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष सगळे बदलणार..?

0
44
Rajyasabha Candidate
BJP

नवी दिल्ली :   लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’ आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे दावे करणाऱ्या भाजप आणि नेत्यांचा मोठा हिरमोड झाला. यानंतर मात्र अनेक महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत अनेक फेरबदल केले. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, या वर्षाअखेरीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डिसेंबरमध्ये भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त केले जातील. तर, पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑगस्टपासूनच या पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपूर्वी व्यापक सदस्यत्व मोहीम राबविली जाणार आहे. याशिवाय जिल्हा आणि राज्य घटकांच्याही या काळात नियुक्त्या केल्या जाणार आहेत. (BJP)

BJP | काय सांगता..! चोरांनी भाजप अध्यक्षांचीच फॉर्च्युनर कार चोरली

BJP | भाजप नव्या अध्यक्षाच्या शोधात

१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान मंडल (स्थानिक युनिट) अध्यक्षांसाठी निवडणूक होणार असून, नंतर १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. नपी. नड्डा (J. P. Nadda) यांचा कार्यकाळ हा यावर्षी जानेवारीत संपला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी जूनपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. तर, या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांची देशाच्या आरोग्यमंत्री वर्णी लावण्यात आली. यामुळे आता भाजप नव्या अध्यक्षाच्या शोधात असून, यावर्षी डिसेंबरपर्यंत भाजप नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नेमणुक करण्याची शक्यता आहे.

BJP Manifesto | मोदींच्या ११ मोठ्या घोषणा; मोफत रेशन आणि उपचार

अशी आहे संपूर्ण नियुक्ती प्रक्रिया 

सदस्यत्व नोंदणी मोहीम १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत सक्रिय सदस्यत्व मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेची पडताळणी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याआधी नोव्हेंबर महिन्यात मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवड होईल व त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महिती आहे. भाजप मंडल अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू होईल. राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवड झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here