Nashik Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पत्नीच्या खुनानंतर पतीचं टोकाचं पाऊल

0
48
Pune Crime
Pune Crime

Nashik Crime | नाशिकमधील परसूल येथील पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. (Nashik Crime)

Crime News | शाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर केला बलात्कार; नंतर गर्भवती केलं अन् अखेर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसूल येथील भाऊसाहेब बरकले (वय ३५) आणि पत्नी सुनीता (वय ३०) यांच्यात नेहमी वाद होत होते. भाऊसाहेब सुनीताच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता आणि यातूनच त्यांच्यात वाद व्हायचे. शुक्रवारी (दि.१) दुपारी त्यांच्यात वाद झाले. त्यातूनच भाऊसाहेबने पत्नी सुनीता हिचा गळा दाबून खून केला.

सुनीताच्या खुनाचा कोणाला संशय येऊ नये यासाठी पती भाऊसाहेबने तिच्या तोंडात विषारी औषध ओतत तिच्या आत्महत्येचा बनाव तयार केला.

Election Result | नाशिक भाजपा कार्यालयात ढोलताशांवर नाचले पदाधिकारी; विजयाचा जल्लोष 

यानंतर भाऊसाहेबने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसपाटील सोनाली सोनवणे यांनी माहिती दिल्याने चांदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आलेली होती. या घटनेसंदर्भात पोलिसांनी मृताच्या घरच्यांची तसेच नातेवाइकांची कसून चौकशी केली. यात भाऊसाहेब हा पत्नी सुनीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती लताबाई ठाकरे (५०, उमराणे शिवार, परसूल) यांनी पोलिसांना दिली आहे. लताबाई ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाऊसाहेब बरकलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here