घरफोड्या ते वाहनचोरी; यंदा चोरट्यांची दिवाळी जोरात, शहर पोलीस करतायत काय ?

0
21

नाशिक : शहर व परिसरात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांनी नाशिककर पूर्णपणे हादरलेला आहे. ऐन सणासुदीत अनेक चोरटे विविध भागात घरफोडी, वाहनचोरी करत आहेत. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, शहरभर घरफोडीच्या व वाहनचोरीच्या एवढ्या घटना होऊनही तपासात काहीच हाती लागत नसल्यामुळे शहर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभी राहिली आहे.

पहिली घटना मखमलाबाद गावात घडली असून चित्राबाई संजय वराड यांच्या घरातून गेल्या बुधवारी (ता.१९) अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आणि घरातून रोकड व दोन तोळ्याची सोन्याची पोत असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे., हवालदार रानडे अधिक तपास करत आहेत.

तर दुसरी घटना सिडकोतील पाटीलनगरमध्ये घडली असून एकनाथ दिगंबर पाटील यांच्या भाड्याने राहत असलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी (ता.१८) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाची कडी तोडत आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कपाटातून मौल्यवान वस्तू चोरून नेले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक पावरा हे तपास करत आहेत.

उपनगरला तिसरी घरफोडी घटना घडली. गेल्या १५ ते १८ तारखेदरम्यान अज्ञात चोरट्याने उमर हनिफ शेख यांच्या बंद घराचा कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने व १० हजार रुपयांचा टीव्ही असा ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दोन महागड्या गाड्याही चोरीला

दरम्यान, शहरात एकीकडे दुचाकीचोरी सुरूच असताना, आता चोरट्यांनी आपला मोर्चा मोठ्या व महागड्या गाड्यांकडे वळवला आहे. तीन दिवसात दोन महागड्या गाड्या चोरीला गेल्या आहेत. पंचवटी येथील सत्यानंद ठाकर यांची ८ लाख रुपयांची क्रेटा कार मनपा पंचवटी विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या मोंघीबाई धर्मशाळाजवळ उभी केली होती. ती गत मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

त्याआधी दोनच दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरातूनही ७ लाख रुपयांची क्रेटा कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. अद्यापही या कारचा तपास लागू शकलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांसमोर ह्या चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले असून वेळीच या चोरट्यांचा छडा लावणे गरजेचे असल्याचे नाशिककरांनी व्यक्त केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here