एक झंझावाती वादळ काळाच्या पडद्याआड ; तात्यांच्या निधनाने तालुका हळहळला

0
3

देवळा : देवळा तालुक्याची पहाट आज अतिशय दुःखद उगवली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचं गुरुवारी रात्री साडे बारा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तात्यां हे अतिशय लोकप्रिय असल्याने त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. पाच -सहा दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यासह देवळा तालुक्यात शोककळा पसरली आहे

तालुक्यासाठी मोठी धक्कादायक बातमी असून लाडक्या तात्यांच्या पार्थिवावर आज (दि.२१ ऑक्टोबर, शुक्रवार) दुपारी २  वाजता देवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. आजपर्यत तात्यांनी अनेक पद भूषवली असून वसाकाचे चेअरमन म्हणून देखील त्यांचे काम महत्वाचे ठरले आहे. त्याचबरोबर आमदारकी देखील भूषवली असून त्यांचा मतदारसंघात चांगलाच प्रभाव होता. वरिष्ठांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध नेहमी अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे देवळा तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची प्रचंड मोठी हानी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील निष्कलंक, निस्वार्थी, एक संघर्षयोद्धा, चारित्र्यवान, दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पदे यशस्वीपणे निभावलेला एक आदर्श नेता म्हणून त्यांची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. त्यांच्या जाण्याने तालुक्यासह पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here