इगतपुरीच्या पूर्व भागात भातशेतीसह बागायती शेती पाण्यात, अवकाळीने शेतकरी हवालदिल

0
2

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून या परतीच्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील भातशेतीसह बागायती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करत दुबार पेरणी करत पिकांची लागवड केली होती असे असतांना सध्या यावर्षी पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहिले.

गेल्या दोन तीन दिवसांत धुवधार बरसलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गाव परिसरातील भात पिकांसह, बागायती शेती धोक्यात आली आहे.पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायतांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे बेलगाव तऱ्हाळे येथील शेतकरी निवृत्ती वारूंगसे, कुंडलिक सोनवणे, अनिल सोनवणे, पांडुरंग वारूंगसे, राहुल वारूंगसे, सोपान वारूंगसे ,नामदेव आव्हाड यांच्या भात, सोयाबीन, काकडी आदी पिकांसह अन्य बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करावा. अशी मागणी बेलगाव ग्रामपंचायत उपसरपंच संतोष वारुंघुसे ,माजी उपसभापती पांडुरंग वारुंघुसे यांच्या सह शेतकऱ्यांनी केली आहे.

“सध्या पूर्व भागात जोरदार अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली भात शेती,ल व इतर बागायती पिके ही पावसामुळे आडवी पडून भुईसपाट होत आहे.यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे सदर नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी आम्हां शेतकऱ्यांची मागणी आहे.”
– संतोष वारुंघुसे उपसरपंच बेलगाव


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here