Nashik Crime | खबरदार! रस्त्यावर बर्थडे कराल तर नाशिक पोलिस देणार गिफ्ट

0
16
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  वाढदिवसानिमित्त एखाद्या चौकात गर्दी जमवून आरडाओरड करून केक कापत धिंगाणा घालणाऱ्यांना आता पोलिसांनी ‘खाकी स्टाइल’ शुभेच्छा देण्यास सुरुवात केली असून नाशिकरोड भागात वाढदिवसानिमित्त फटाके फोडणाऱ्यांसह कारगिल चौकात गर्दी जमविणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हे नोंदविलेले आहेत. त्यामुळे शहरात रस्त्यालगत ‘बर्थडे सेलिब्रेशन’ करणाऱ्या टोळक्यांना आता चाप बसणार आहे. (Nashik Crime)

Agriculture | केंद्राचा मोठा निर्णय! बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी

नाशिक शहरातील ‘Street Crime’ नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे टवाळखोरांसह रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून यासह काही दिवसांपासून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांसह हातगाडीधारक आणि इतरांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पोलिसांनी रस्त्यालगत वाढदिवस साजरे करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात येत आहे. संशयितांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम 135 अन्वये अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले असून संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे. (Nashik Crime)

प्रसंग १ :

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल चौकात सायंकाळी 5 वाजता 13 जणांनी गर्दी केली होती. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून वाढदिवस साजरा करण्यास आयुक्तालयाने परवानगी नाकारलेली असताना असे प्रकार होत असल्याने पथक दाखल झाले. त्यांनी सूरज ओमप्रकाश राजपूत (वय 32), जीव दिघोळे तसेच आणखी आठ-दहा संशयितांवर अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

प्रसंग २ :

मध्यरात्री 01 वाजता नाशिकरोडच्या खर्जुल मळा परिसरात काही जण जमले आणि त्यांनी फटाके वाजवून वाढदिवस साजरा केला. त्या ठिकाणी पोलिसांचे पथक पोहोचले, तेव्हा या टोळक्याची आरडाओरड सुरू होती. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी गायधनी, शेखर गायधनी, आकाश जारस, भारत सालकर या संशयितांवर अदखपात्र गुन्हा नोंदवलेला आहे. (Nashik Crime)

पोलिसांनी नाशिक शहरात दिवसा तसेच रात्री गस्त वाढवली आहे. कॉलेज, शाळा, मोकळी मैदाने या ठिकाणी टवाळखोर, रिकामटेकडे, उपद्रवी यांचा शोध घेतला जातो आहे. काही कारण नसताना गर्दी करणारे आणि टवाळक्या करणाऱ्यांना वेळीच समज दिली जात आहे. तर काही जणांना वेळेप्रसंगी चोप देत उठाबश्या काढण्यास सांगितले जात असून विशेष म्हणजे, प्रतिबंधात्मक कारवाईसह गुन्हे उकल झाल्याबाबतची माहिती आयुक्तालयातर्फे ‘एक्स’वर अपलोड होत आहे. त्यामुळे नाशिककरांमार्फत त्यावर प्रतिक्रिया नोंदवून या कारवाईचे स्वागत होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here