Nashik Bhavli Dam | नाशिकच्या भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू

0
16
Nashik Bhavli Dam
Nashik Bhavli Dam

Nashik Bhavli Dam | नाशिकच्या भावली धरण (bhavli dam) येथे नाशिक रोड परिसरातील रहिवासी असलेल्या ३ मुली व २ मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. अनस खान दिलदार खान (वय १५), नाझिया इमरान खान (वय १५) मीजबाह दिलदार खान (वय – १६) हनीफ अहमद शेख (वय – २४) ईकरा दिलदार खान (वय -१४) सर्व (रा. गोसावी वाडी, जेल रोड नाशिक) (Nashik News)

Deola | खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोन चिमूरड्यांचा मृत्यू

आज दुपारी हे सर्व पर्यटक मृतक हनीफ शेख यांचे मालकीचे रिक्षाने भावली धरण येथे फिरण्यासाठी अंदाजे पाच वाजता आले असता येथे भावली धरणातील पाण्यात खेळत असताना पाण्यात बुडून यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश असून हे पाच जण बुडाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे नेण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहे. (Nashik News)

Crime News | आईचा डोळा लागला आणि १० महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here