Nashik Accident | राहुड घाटातील अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू; दोन प्रवासी देवळा तालुक्यातील

0
31
Nashik Accident
Nashik Accident

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चांदवड येथील राहुड घाटात मंगळवारी (दि. ३०) रोजी एसटी बस व ट्रक यात जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यात देवळा तालुक्यातील दोन प्रवाशांचा समावेश आहे. चांदवड जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटात काल झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाली असून, यात देवळा तालुक्यातील साई संजय देवरे (वय १४) (रा.उमराणे. ता देवळा) व सुरेश तुकाराम सावंत (वय २८) (रा.डोंगरगाव ता.देवळा) या दोघे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.(Nashik Accident)

Nashik Accident | मुलाचा मृत्यू; वडील जखमी 

उमराणे येथील १४ वर्षीय साई देवरे हा व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल उमराणे येथे ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. वडिलांची परिस्थिती सर्वसामान्य असल्याने त्यांचे वडील संजय दामो देवरे हे चांदवड येथे नेमीनाथ हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर होते. दरम्यान, वडील संजय हे आजारी असल्याने ते मुलगाय साई सुट्टीसोबत नाशिक येथे उपचारासाठी दावखान्यात बसने जात होते. यावेळी काळाने घाला घातला असून अपघातात साईचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि वडील संजय हेदेखील जखमी आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. संजय देवरे यांचा एकुलता एक मुलगा होता.(Nashik Accident)

Nashik Accident | राहुड घाटात एसटी बस-ट्रकचा अपघात; आठ प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता

नियुक्ती पत्र घेण्यासाठी मुंबईला जाताना काळाने घाला घातला

डोंगरगाव येथील २८ वर्षीय सुरेश याची नुकतीच सुरक्षा रक्षक पदासाठी नियुक्ती झाली होती आणि तो नियुक्ती पत्र घेण्यासाठी मुंबईला जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला असून, या अपघातात त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन होता. नोकरी करून कुटुंबाला हातभार लावण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यांचे वडील तुकाराम जयराम सावंत हे शेती करतात आणि आई रंजना या गृहीणी आहे. तर लहान भाऊ अमोल आणि मोठी बहीण विवाहित बहीण आहे.(Nashik Accident)

गावालगत अडीच एकर शेती असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. परिस्थिती सर्वसामान्य असल्याने सुरेश ने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले असून, तो आता नोकरीच्या शोधात होता. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले होते. मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता डोंगरगाव येथे त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.(Nashik Accident)

Nashik Fire Accident | निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसला आग


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here