Nashik ACB | लाच घेताना नाशिकच्या बड्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले

0
41
Nashik ACB
Nashik ACB

नाशिक :  आज सकाळीच ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांनी तडीपारीची नोटिस बजावली. हे प्रकरण निवळते तोच आता नाशिक पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे व पुरातत्व विभागातील नाशिकमधील सहाय्यक संचालिका आरती आळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या दोघांना दीड लाखांची लाच घेताना नाशिक एसीबीने (Nashik ACB) रांगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik ACB | नेमकं प्रकरण काय..?

या दोघं अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदाराला कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. ते देण्यासाठी सहाय्यक संचालिका आरती आळे यांनी ६ मे रोजी दीड लाखांची लाच मागितली होती. आळे यांची चौकशी केली असता, त्यात महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे हेदेखील सहभागी असल्याचे समोर आले. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे आरती आळे या सध्या बाळंतिण असून, तेजस गर्गे यांचा एसीबी शोध घेत आहे. संशयित आरोपी आरती मृणाल आळे (वय ४१, रा. रानेनगर, नाशिक) यांना दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(Nashik ACB) मंगळवार रोजी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. तर, तेजस गर्गे (डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलणालय विभाग) यांनीदेखील या लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिली असल्याने त्यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल झाला आहे.

Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

अशी केली कारवाई

दरम्यान, या प्रकरणी संबंधित तक्रारदाराला कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिकमधील  सहाय्यक संचालक कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. यासाठी त्यांनी सहायक संचालकांकडे अर्ज दिला होता. मात्र, त्या बदल्यात आरती आळे यांनी त्यांच्याकडे दीड लाखांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती.

यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Nashik ACB) पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांच्या निर्देशांनुसार याविरोधात सापळा रचण्यात आला आणि आरती आळे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना मंगळवारी रंगेहाथ ताब्यात घेतले. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत गर्गे यांचेही नाव समोर आले.

Acb raid : लाचखोरी काही थांबेना ; तीन लाखांची लाच स्वीकारतांना पोलीस निरीक्षकासह दोघे ताब्यात


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here